९\११ची २० वर्षं : ‘वॉर ऑन टेरर’ तर फुस्स झालं, पण आजही ‘युद्ध’ आणि ‘दहशतवाद’ ही जगापुढील आव्हानं आहेत…
आता अमेरिकेचं युद्ध चीनच्या दिशेनं वळू लागलंय आणि नवी समीकरण जुळवली जात आहेत. अवघ्या तीन वर्षांपूर्वी अमेरिका अल्-कायदाशी संबंधित असलेल्या ‘इस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’शी अफगाणिस्तानमध्ये संघर्ष करत होती. आता त्याच अतिरेकी संघटनेला अमेरिकेच्या सूचीतून हटवण्यात आलंय. हा आहे अमेरिकेचा दहशतवादविरोधाचा खरा चेहरा. तो दिवस फार लांब नाही, जेव्हा अमेरिकेने अजून एक नवा शत्रू आणि अजून एक नवं युद्ध शोधून काढलेल.......